सामाजिक व मूलभूत सार्वजनिक सुविधांची यथार्थ उपलब्धता सामाजिक आर्थिक व राजकीय संधीचा उपयोग करणे.
संस्थेची उद्दिष्टे व कार्यदृष्टी
बळकट समाज व्यवस्थेमार्फत पूर्णत्ववादी सर्व समावेशक आणि चिरस्थायी समाज विकास साधणे.
आमचे ध्येय
बळकट धनगर समाज व्यवस्थेमार्फत पूर्णत्ववादी सर्व समावेशक आणि चिरस्थायी समाज विकास साधणे. समृद्ध धनगर वाडी / वस्ती संपन्न धनगर समाज पर्यावरण संतुलित वाडी / वस्ती परिसर विकास आणि विकसित करणे.
कार्यदृष्टी
संस्थेच्या उद्दिष्टांचे स्वरूप
Main Objectives
१
समाज बांधवांमध्ये स्नेहभाव बंधुभाव वृद्धिगत करणे.
२
समाजाची नैतिक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा विषयक तसेच आर्थिक विषयक उन्नती करणे त्यासाठी प्रयत्न करणे.
३
समाजातील गरजू हुशार होतकरू मुलांसाठी युवक युवती साठी शिक्षण, व्यवसाय, शिष्यवृत्ती यासाठी आर्थिक व अन्य प्रकारची मदत करणे.
४
निराधार वृद्ध अपंग व्यक्तींना आधार देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे.
५
समाज उपयोगी मासिके पत्र के दिनदर्शिका प्रसिद्ध करणे.
६
शासकीय स्तरावर जाहीर होणाऱ्या अनेक योजनांचा समाजातील गरजू लोकांना लाभ मिळवून देणे.
७
समाजातील बेरोजगार व्यक्तींसाठी व्यवसाय कौशल्य विकास कार्यक्रम स्पर्धा परीक्षा शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर तज्ञांची मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे.
८
संस्थेच्या सभासद वार्षिक स्नेह संमेलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा आयोजित करून त्यामध्ये सहभाग घेणे.
९
नैसर्गिक व अनैसर्गिक आपत्तीत आपत्तीग्रस्तांना शक्य ती मदत करणे.
१०
समाजातील महिला वर्गासाठी महिला स्वावलंबन संदर्भात शासकीय व निमशासकीय योजनेबाबत माहिती उपलब्ध करून महिला सक्षमीकरणासाठी प्रतिसाद करणे.
११
समाजातील सर्वांची प्रतिष्ठा व मानसन्मान याचे रक्षण करणे.
१२
संस्थेचे कार्यक्षेत्र भविष्यामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय करणे.
१३
समाजातील वधू वर पालक परिचय मेळावा आयोजित करणे तसेच यामध्ये धनगर समाजाच्या वधू-वरांना सहभाग घेता येईल व वधु वर मेळावा वर संस्थेचे नियंत्रण राहील.
१४
संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी स्नेह मेळावा आनंद मेळावा तसेच निसर्ग सहल आयोजित करणे.
१५
दरवर्षी समाजातील उच्चशिक्षित व पदवीधर विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करणे.
